मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीच्या कथित विटंबनेच्या निषेधार्थ देहूरोड काँग्रेस आक्रमक; ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध

काशिनाथ शिंदे : देहूरोड

अ खिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे यांच्या उपस्थितीने विटंबना झाल्याचे सांगत शुद्धीकरण विधी करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीचा देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हा निषेध कार्यक्रम पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तू, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूरभाई शेख, सचिव बबन टोम्पे, युवा नेते मलिक शेख, सदस्य विष्णू नरसप्पा, युवा नेते आसिफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते महेश गायकवाड, मलंग शेख, अहमद शेख, भूपेंद्र सिंग, शिवाजी जगदाळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीचा आदर राखणे हीच काँग्रेसची भूमिका असून, जातीभेदमनुवादी विचारसरणीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा कृतींचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

See also  परराज्यातील मजुरांवर 'डिजिटल दरोडा'! फिंगरप्रिंटने मोबाईल अनलॉक करून खात्यातील पैसे लुटणारी टोळी जेरबंद
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!