दारूतस्करांचा ६० किमी थरार! पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; अपघातानंतर कारवाई, श्रेयावरून दोन पोलिस ठाण्यांत चर्चा

काशिनाथ शिंदे: शेवगाव पाचोड

अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारचा शेवगाव पोलिसांनी तब्बल ५० ते ६० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत मोठी कारवाई केली. मात्र, पाठलागानंतर कार पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा गावाजवळ अपघातग्रस्त झाल्याने कारवाईच्या श्रेयावरून शेवगाव आणि पाचोड पोलिस ठाण्यांमध्ये कथित मतभेदांची चर्चा रंगली आहे.

या कारवाईत बाळू बाबाराव बहिरवाळ (वय ३०, रा. घोसापुरी, ता. जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव परिसरातून एमएच १२ जीझेड १७७७ क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत कुसारे, शाम गुंजाळ, प्रशांत आंधळे आणि सुरेश भावले यांच्या पथकाने वाहनाचा शोध घेतला.

संशयित वाहनाचा माग काढताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे ५० ते ६० किलोमीटरपर्यंत रंगलेल्या या थरारक पाठलागात चालकाने पोलिसांना चकवा देण्यासाठी भरधाव वेगाने वाहन पळविण्याचा प्रयत्न केला. काही काळ परिसरात अक्षरशः ‘चोर-पोलिस’ खेळ सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

अखेर पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा गावाजवळ भरधाव इनोव्हा कार अपघातग्रस्त झाली. त्यानंतर शेवगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटना पाचोडच्या हद्दीत घडल्याने स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. दोन्ही पोलिस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईत इनोव्हा कारसह अवैध दारू आणि अन्य साहित्य असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मात्र, या कारवाईनंतर पाठलाग शेवगाव पोलिसांनी केला, तर अंतिम कारवाई पाचोडच्या हद्दीत झाली. त्यामुळे या कारवाईचे श्रेय नेमके कोणाला, यावरून दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

See also  पुणे–मुंबई एक्सप्रेस हायवे बंद!

या प्रकरणात आरोपीविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईच्या श्रेयाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणती अधिकृत भूमिका स्पष्ट करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षेला प्राधान्य; पुढील एक वर्ष ऑनलाइनऐवजी ओएमआर पद्धतीने परीक्षा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची…

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा ठाम संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: सुरक्षित मातृत्व ही केवळ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!