NEET गोंधळावरून ठाकरे आक्रमक; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी २६ जुलैला मुंबईत पक्षविरहित मोर्चाची हाक

काशिनाथ शिंदे : मुंबई

मुंबई : NEET परीक्षेतील कथित गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत २६ जुलै रोजी मुंबईत पक्षविरहित मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

ठाकरे म्हणाले की, सत्तेवर असलेल्या सरकारने झालेल्या चुकीची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विरोधात असताना इतरांकडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता स्वतःच्या मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सरकार आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “हा सत्तेचा उद्धटपणा आहे. आम्ही कोणाशीही बोलणार नाही, आंदोलनकर्त्यांशीही संवाद साधणार नाही, अशी भूमिका लोकशाहीला धरून नाही,” असे ठाकरे म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

घोषणेनुसार, २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील पुतळ्यापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पूर्णपणे पक्षविरहित असून कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील, असेही स्पष्ट करण्यात आले

See also  शिवणेत गुटख्याचा काळाबाजार उघड; १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
  • Related Posts

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्याची नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा ठाम संदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: सुरक्षित मातृत्व ही केवळ…

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा