अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी

काशिनाथ शिंदे

पुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील अश्लील व विभत्स डीजे नृत्यप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळत असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारांविरोधात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले असून, ही मोहीम आता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही वर्षांत विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अश्लील नृत्यप्रकारांचे प्रमाण वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत घेवारे यांनी महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा प्रशासन, पुणे पोलीस प्रशासन आणि गृह विभागाकडे वेळोवेळी निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणी केली होती.

पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचेही सहकार्य लाभल्याचे घेवारे यांनी नमूद केले.

“पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे”

“अश्लील डीजे नृत्यप्रकारांविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत आलो आहोत. आमच्या मागणीवर पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून कारवाई होत आहे, ही समाधानाची बाब आहे. आमच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया टीना शर्मा घेवारे यांनी दिली.

कलाकारांच्या वतीने प्रशासनाकडे हा प्रश्न सातत्याने मांडण्यात आला असून, त्यासंदर्भातील निवेदने आणि कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपण्याची गरज

महाराष्ट्र ही संत, महापुरुष, समाजसुधारक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेची भूमी आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील किंवा विभत्स प्रकारांना प्रोत्साहन मिळू नये, अशी भूमिका घेवारे यांनी मांडली.

“महाराष्ट्राची ओळख संतांची आणि सुसंस्कृत महाराष्ट्र अशी आहे. त्यामुळे अशा प्रकारांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

See also  पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी संधी; ‘NS’ नवीन मालिकेची नोंदणी लवकरच

पुण्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात कारवाईची मागणी

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईचे स्वागत करताना ही मोहीम केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबविण्याची मागणी घेवारे यांनी केली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन, आयोजकांची जबाबदारी आणि कार्यक्रमातील कलाकारांच्या सादरीकरणावर नियंत्रण याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“ज्या पद्धतीने आमच्या मागणीवर पुणे पोलीस प्रशासन आणि शासनाने अंमलबजावणी केली आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही कारवाई व्हावी. पुणे असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, अश्लील डीजे नृत्यप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” असे टीना शर्मा घेवारे यांनी म्हटले.

कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास सार्वजनिक कार्यक्रमांमधील अश्लीलतेला आळा घालता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान विशेष तपासणी मोहीम; प्रवाशांना तक्रारीसाठी संपर्क क्रमांक जाहीर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खासगी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!