काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रविण शिर्के, तर पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची शुक्रवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
पिंपरी येथे झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी प्रविण शिर्के, कार्याध्यक्षपदी प्रविण (बाबू) कांबळे, उपाध्यक्षपदी अविनाश पर्बत, बद्रीनारायण घुगे आणि विकास साळवे, सरचिटणीसपदी ओमप्रकाश पांडे, खजिनदारपदी दिनेश दुधाळे, तर सहखजिनदारपदी संजय धुतडमल यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून गोविंद देशपांडे, प्रदीप सपकाळ, सारिका भिंगे आणि पंकज लालझरे यांची निवड करण्यात आली. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रतिनिधीपदी अनिल भालेराव, तर सल्लागारपदी बाळासाहेब ढसाळ यांची निवड झाली. महिला अध्यक्षपदी माधुरी कोराड आणि महिला उपाध्यक्षपदी श्रद्धा प्रभुणे यांची निवड करण्यात आली.
डिजिटल पत्रकार संघाचीही नवी कार्यकारिणी
पिंपरी-चिंचवड डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राम बनसोडे यांची निवड झाली. कार्याध्यक्षपदी देवा भालके, उपाध्यक्षपदी गौरव साळुंखे, विकास चौधरी आणि मुझफ्फर इनामदार, सरचिटणीसपदी भीमराव बरगडे, सहसरचिटणीसपदी निलेश सायकर, खजिनदारपदी श्याम सोनवणे आणि सहखजिनदारपदी शेहनाज कुरणे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून शैलेष जाधव, सचिन सोनवणे आणि संजय राजगुरू यांची निवड झाली. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देणे तसेच डिजिटल पत्रकारितेला संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.







