काशिनाथ शिंदे
पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
देहू ते आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्ग हा भविष्यात या परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नागरिकांना सक्षम, सुलभ आणि वेगवान सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनस्तरावर आवश्यक ती गती मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
यावेळी प्रभागातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत समस्या तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांचे निवेदनही त्यांच्याकडे सादर करण्यात आले.
“नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे, हीच माझी भूमिका आहे. विकासकामांना गती देऊन नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार आहे,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शक विष्णू मोरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमृत अप्पा सोनवणे, प्रदीप भाऊ आहेर, दत्तात्रय भाऊ मोरे, बाळासाहेब (दादा) मोरे, रामभाऊ मोरे, देविदास भाऊ कारले, नवनाथ भाऊ भोसले आदी उपस्थित होते.






