रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड

रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सेक्टर २४ येथील वीज उपकेंद्रातून स्वतंत्र विद्युत वाहिनी मंजूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी नगरसेविका तथा प्रभाग अध्यक्षा शिवानी दादासाहेब नरळे यांनी महावितरणकडे केली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

रुपीनगर व सहयोगनगर परिसरात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या, व्यापारी आस्थापना तसेच लघुउद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी परिसरातील विजेची मागणी वाढली असून, सध्याच्या विद्युत वाहिनीवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार वीजखंडित होणे, तांत्रिक बिघाड, वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी-जास्त दाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सेक्टर २४ येथील वीज उपकेंद्रातून रुपीनगर–सहयोगनगर परिसरासाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकल्यास सध्याच्या वीजवाहिनीवरील भार कमी होऊन परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

नगरसेविका शिवानी दादासाहेब नरळे यांच्या वतीने दादासाहेब नरळे यांनी महावितरणच्या भोसरी विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले. यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

या चर्चेदरम्यान स्वतंत्र विद्युत वाहिनीच्या कामाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक स्थिर वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

या कामासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, महावितरणचे भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, प्राधिकरण विभागाचे अभियंता महाजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे तसेच गणेशनगर विभागाचे कार्यकारी अभियंता बनसोडे यांच्याशी या विषयावर सातत्याने चर्चा करण्यात येत आहे.

See also  "वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! आमदार शिवाजी (भाऊ) पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी माथाडी कामगारांकडून गोसेवा"

रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील नागरिकांची वीजपुरवठ्याची गंभीर समस्या लक्षात घेता महावितरण प्रशासनाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. स्वतंत्र विद्युत वाहिनी कार्यान्वित झाल्यास वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येतून नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळण्याची शक्यता आहे

  • Related Posts

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकांचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी करत तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या विरोधात व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे,…

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    १७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी; स्ट्रॉबेरी लागवड किटसाठी ९० टक्के अनुदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: आदिवासी शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर

    पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर

    मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे

    मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे

    गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!

    गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!