एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव

एमएफएसच्या दहा, एसआरपीएफच्या दोन तुकड्यांना घडविणाऱ्या हरिभाऊ इंगोले यांचा गौरव

 कोकण विभाग रोहयोचे सहआयुक्त संदीप पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानपत्र प्रदान

काशिनाथ शिंदे / पाटस : महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या (एमएफएस) दहा तुकड्या आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) दोन तुकड्यांना खडतर, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत उल्लेखनीय कामगिरी करणारे नानवीज (ता. दौंड) येथील प्रशिक्षक हरिभाऊ भारत इंगोले यांचा कोकण विभागीय आयुक्त संदीप पवार यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट प्रशिक्षक’ म्हणून सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दौंड येथील राज्यातील एकमेव विशेष राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात हरिभाऊ इंगोले चार वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नव्याने भरती झालेल्या जवानांना शारीरिक क्षमता, कवायती, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य कवायत मैदानावर आयोजित नेत्रदीपक संचलन सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या तथा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. इंगोले हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढेज गावचे सुपुत्र आहेत. महाराष्ट्राच्या पारंपरिक मर्दानी खेळ ‘लेझीम’चे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. एसआरपीएफ तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या एकूण दहा तुकड्यांना त्यांनी अत्यंत खडतर व शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जवान सक्षमपणे सेवेत दाखल झाले आहेत.

त्यांच्या कार्याची दखल घेत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दूरध्वनीद्वारे विशेष अभिनंदन केले. यापूर्वीही अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद भापोसे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून प्रशस्तीपत्र प्रदान केले होते. ग्रामीण भागातून पुढे येत कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर हरिभाऊ इंगोले यांनी घडविलेली कारकीर्द आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

See also  "‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद"

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!