मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवडकरांना मोठी आरोग्य भेट; महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू, पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराचा मार्ग मोकळा

 

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असून उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि समन्वयाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ पात्र नागरिकांना सुलभपणे मिळावा, यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, संबंधित रुग्णालयांशी समन्वय तसेच लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या कक्षामार्फत मदत केली जाणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि कामगारनगरी असल्याने अनेक कुटुंबांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयात दाखल होण्यापासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पूर्तता आणि समन्वयासाठी दोन आरोग्यमित्रांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली असून भविष्यात गरजेनुसार या सेवेचा विस्तारही करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी मनोज शिंदे (८४१२९९५५९९), अभिजित पानखेडे (९११२४०४१८१) यांच्याशी संपर्क साधावा किंवा टोल-फ्री हेल्पलाईन १८०० २३३ २२‍०० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे ४,८०० हून अधिक शासकीय व खासगी रुग्णालये आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनांशी संलग्न आहेत. पात्र नागरिकांना कॅशलेस उपचाराचा लाभ वेळेत मिळावा यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून या योजनांविषयी अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक आहे.

See also  न्यायाधीश वाढले... पण न्यायालय अजूनही सुविधांच्या प्रतीक्षेत!; मोरवाडी न्यायालयात कर्मचारी, अभियोक्ते आणि मूलभूत सुविधांचा तीव्र तुटवडा

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, शहरातील कोणताही नागरिक केवळ आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष नागरिक आणि शासन यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून कार्य करेल. पात्र रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत आणि शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, यासाठी या कक्षामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

याप्रसंगी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, नगरसदस्या अनुराधा गोरखे,सुप्रिया चांदगुडे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, तसेच विविध पदाधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

  • Related Posts

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    पुण्यात प्रशासनाच्या कारवाईचे टीना शर्मा घेवारे यांच्याकडून स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमधील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

    आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!