कोयता गँगचा पुन्हा रक्तरंजित धुमाकूळ! १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; ४ आरोपी जेरबंद, भर पावसात पोलिसांनी काढली धिंड

काशिनाथ शिंदे : पुणे

पुण्यातील कात्रज परिसरात कोयता गँगने पुन्हा एकदा रक्तरंजित थैमान घालत १७ वर्षीय गणेश रवींद्र माळवे या अल्पवयीन तरुणाची निर्घृण हत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून तब्बल सात जणांनी कोयत्याने सपासप वार करून ही हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी भररस्त्यात गणेशवर जीवघेणा हल्ला चढवला. कोयत्याने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे कात्रज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या काही तासांत सातपैकी चार आरोपींना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची भर पावसात घटनास्थळी धिंड काढत गुन्ह्याची पुनर्रचना केली. या कारवाईने परिसरात मोठी चर्चा रंगली असून गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

मृताच्या नातेवाईकांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हत्येने पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

See also  काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
  • Related Posts

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती