नीट २०२६ मध्ये आयआयबीचा जलवा! ६ विद्यार्थ्यांना ६५०+ गुण; ६० हून अधिक विद्यार्थ्यांची ६००+ गुणांसह दैदिप्यमान कामगिरी

काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी : वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेचा लौकिक पुन्हा एकदा सिद्ध करत पिंपरीतील आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटने नीट-२०२६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेच्या ६ विद्यार्थ्यांनी ६५० पेक्षा अधिक गुण, तर ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय शेकडो विद्यार्थ्यांनी ५३० पेक्षा जास्त गुण मिळवत यशाचा नवा विक्रम रचला आहे.

या अभूतपूर्व यशानिमित्त मोरवाडी येथील संस्थेच्या परिसरात ‘नीट २०२६ यशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर आनंदोत्सवाने दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाला संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश दिला.

पिंपरी-पुणे शाखेतील गणेश देशमुख, शुभम शेम्बडे, आर्यन गावडे, शुभदा जगदाळे, तुषार राऊत, सदानंद हुंडेकर, मनीष पाटील, तन्मय भंडारी, सायली जरड, अमित शिंदे, साहिल बिरादार, आनंद राजभर, यश नारेगळकर, संध्या लेकुळे, सानिका शिंदे, प्रथमेश वाघ, श्लोक घरवाल, दिग्विजय लोखंडे, यश खोडे, गायत्री वानखेडे, प्रसमय ताईतवाले, वेद खंदाडे, अभिजित सोनार, प्रज्वल वणवे, स्वानंदी महाजन, साक्षी कुंभार, मयांक पाटील, आदित्य गुट्टे, विनीत कमळकर, शरघवी बडगुजर, समृद्धी पोखरकर, साद बागवान, गणेश पवार, आदित्य जोगी, श्रुती घडत, वैभव कांबळे आणि गायत्री बिल्लारे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शीतल लोहारे आणि संस्थेचे संचालक दैविक मंठाळे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

See also  युनिट-३चा दणका! डीपी चोरट्यांची टोळी गजाआड; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय संस्थेतील नियमित चाचण्या, वैयक्तिक मार्गदर्शन, शिस्तबद्ध अध्ययन पद्धती आणि अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले.

“विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि संस्थेची परिणामकारक शैक्षणिक प्रणाली यामुळे हे यश शक्य झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी करण्यासाठी आयआयबी सदैव कटिबद्ध आहे.”

ॲड. महेश लोहारे, संचालक, आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट, पिंपरी

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!