“महामार्गावर मृत्यूचा सापळा! तुटलेल्या केबलमुळे दोन दुचाकीस्वार कोसळले; प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली”

काशिनाथ शिंदे : कुरळी

कुरुळी हद्दीतील पुणे–नाशिक महामार्गावर मंगळवारी तुटलेली केबल रस्त्यावर पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या केबलमध्ये अडकून दोन दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळल्याची घटना प्रत्यक्षदर्शींनी पाहिली. मात्र, प्रसंगावधान राखत काही नागरिकांनी तातडीने रस्त्यावर पडलेली केबल बाजूला केल्याने पुढील संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून रस्त्यावरील केबल हटवली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळा दूर झाला आणि पुढील अपघात टळले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केबल व्यवसायिकांनी आपल्या केबल लाईनची नियमित तपासणी करणे, तुटलेल्या किंवा सैल झालेल्या केबलची त्वरित दुरुस्ती करणे आणि सार्वजनिक रस्त्यांवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

पुणे–नाशिकसारख्या वर्दळीच्या महामार्गावर निष्काळजीपणामुळे कोणाच्याही जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे संबंधित केबल व्यावसायिकांनी जबाबदारीने काम करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

See also  भोसरीत भाजप स्वयंरोजगार युवा मोर्चाला नवे नेतृत्व; दीपाताई मनोज काळे यांची प्रभाग ५ अध्यक्षपदी नियुक्ती
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!