दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा बलात्कार-पॉक्सो आरोपी अखेर जेरबंद; कर्नाटकातून खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई

  • काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाने तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कार व पॉक्सो कायद्यातील आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक करून पोलिसांच्या स्वाधीन करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईमुळे दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला अखेर कायद्याच्या कचाट्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

निगडी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२६/२०१६ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७६ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ५(जे)(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील आरोपी हनुमंत दुर्गाप्पा कुन्हाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गेल्या दहा वर्षांपासून त्याचा माग काढण्यात पोलिसांना अपयश येत होते.

दरम्यान, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार रमेश मावसकर यांना गुप्त माहितीदारामार्फत आरोपी कर्नाटकात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुनिल कानगुडे यांनी आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून तो कुरागुंड, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी (कर्नाटक) येथे असल्याचे निश्चित केले.

त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार रमेश मावसकर, भूपेंद्र चौधरी आणि पोलीस शिपाई निलेश जाधव यांच्या विशेष पथकाने कर्नाटकमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला निगडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दहा वर्षांपासून फरार असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश आल्याने गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.

See also  सांगवीत पोलिसिंगचा नवा अध्याय!; स्वतंत्र एसीपी कार्यालयामुळे कारभार होणार अधिक गतिमान
  • Related Posts

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    रस्ता महामार्ग घोषित करण्याची प्रक्रिया आणि ‘बांधकाम व नियंत्रण रेषा’ निश्चितीशिवाय कारवाईचा आरोप; सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिज्ञापत्राचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : रस्ता महामार्ग…

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    अश्लील डीजे डान्सविरोधातील लढ्याला अखेर यश!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    गणेशोत्सवात जादा भाडे आकारणाऱ्या खासगी बसवर आरटीओचा कडक वॉच!

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

    गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती