१८ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ६३ वर्षीय फरारी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!

काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड आळंदी

आळंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या ६३ वर्षीय पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. काशिनाथ बाळकृष्ण दिघे (वय ६३, रा. कोयाळी, ता. खेड, सध्या रा. शरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस अंमलदार पीसी/१३०६खेडेकर आणि पीसी/४२३६ राठोड हे ९ ऑगस्ट रोजी पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार खेडेकर यांना दिघे हा शरदवाडी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा करून पथकाने शरदवाडी येथे जाऊन सापळा रचत आरोपी काशिनाथ दिघे याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला आळंदी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

दिघे याच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २७१/२००८, भारतीय दंड विधान कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो तब्बल १८ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होता.

ही उल्लेखनीय कारवाई गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पीसी/१३०६ खेडेकर व पीसी/४२३६ राठोड यांनी केली.

See also  पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा! पाच अधिकाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!