लोणावळ्यात गांजाची तस्करी उधळली; ८.५ किलो गांजासह तरुणाला बेड्या

काशिनाथ शिंदे : लोणावळा

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालयाजवळ सापळा रचून पोलिसांनी ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि हुंडाई आय-१० कार असा एकूणलाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रविवारी (दि. ९) लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत शर्मा हा कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालयाजवळ कारमध्ये गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. काही वेळात संशयित तरुण कारसह तेथे आढळून आला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेत कारची झडती घेतली. यावेळी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचाकिलो ५०० ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार (एमएच १४ बीके ७२३५) जप्त करण्यात आली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) कारवाई करण्यात आली आहे. गांजा कोठून आणला आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सावंत, म्हेत्रे मॅडम, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर सहभागी झाले.

See also  पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बावी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!