देहूरोडमध्ये राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात; स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

काशिनाथ शिंदे : देहूरोड

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू झाले. या आंदोलनाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी देशवासीयांना ‘करेंगे या मरेंगे’ अर्थात ‘करा किंवा मरा’ हा स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रेरणादायी मंत्र दिला. या ऐतिहासिक आंदोलनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक दिशा देत ब्रिटिश सत्तेविरोधातील जनआंदोलन अधिक तीव्र केले.

राष्ट्रीय क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन देशाच्या लोकशाही मूल्यांचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमास पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर मारीमुत्तू, उपाध्यक्ष वेंकटेश कोळी, सचिव बबन टोम्पे, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष विल्सन पालिवाल, सदस्य येशू भंडारी, वेंकटेश विश्वनाथ, गौतम शिंदे, वेंकटेश मारीमुत्तू, विष्णू नरसाप्पा तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  जेवणानंतर काही वेळातच पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत; नागपूर पोलीस दलात खळबळ
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!