मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या हक्कांसाठी संघटित लढा उभारणार; कल्याण-डोंबिवलीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

काशिनाथ शिंदे : कल्याण

मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने कल्याण व डोंबिवली शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची बैठक डोंबिवली येथे उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला.

कल्याण-डोंबिवली विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियानात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून हेल्मेट वाटप, रस्ता सुरक्षा जनजागृती तसेच नागरिक व वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण करणारे उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घाटोळे, वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत कुंभार, प्रसिद्धीप्रमुख विनोद वरखडे, सोशल मीडिया प्रमुख सूरज देवकर, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक अनुदीप येचकर, सल्लागार संतोष कपटकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी ज्योतीताई रवी माळेकर, महाराष्ट्र राज्य सचिवपदी रियाताई गजानन जोशी, तर महाराष्ट्र राज्य संघटकपदी निलेश शेठ हरिश्चंद्र गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन उपस्थित मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल व्यवसायाशी संबंधित विविध अडचणी, परवाने, प्रशिक्षण व्यवस्था, विद्यार्थी व वाहनचालकांच्या समस्या तसेच शासनाच्या विविध नियमांबाबत संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी संघटनेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कल्याण व डोंबिवली परिसरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांची विविध पदांवर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या विस्ताराच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

See also  तडीपाराचा आदेश धाब्यावर! चिखलीत कोयत्यासह आरोपी जेरबंद; शहराच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या हिताचे संरक्षण, त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनदरबारी प्रभावी पाठपुरावा आणि व्यवसायाच्या विकासासाठी राज्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना एका छताखाली आणण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यापक पातळीवर काम करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!