शाहूनगरातील वाढत्या चोऱ्यांवर नागरिकांचा आक्रोश; अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्याकडे धाव, कडक कारवाईची मागणी

पिंपरी-चिंचवडमधील शाहूनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांची भेट घेऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शाहूनगर परिसरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी रात्रीचीपोलीस गस्त वाढविणे, संशयित व्यक्तींवर कठोर कारवाई करणे, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना राबविणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाहूनगर परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ठोस उपाययोजना अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी अधिक प्रभावी गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

See also  कामगाराच्या मृत्यूप्रकरणी अभियंता-ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!