तुकाराम मुंढे यांचा ब्लडबँकांवर मोठा प्रहार! २१ ब्लडबँकांचे परवाने निलंबित; २ परवाने कायमचे रद्द

काशिनाथ शिंदे  मुंबई

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईचा वेग कायम ठेवत आता ब्लडबँक आणि ब्लड स्टोरेज सेंटरमधील अनियमिततांवर मोठी कारवाई केली आहे. मेडिकल दुकाने आणि दूध भेसळ प्रकरणांनंतर आता रक्तपेढ्यांमधील नियमभंग करणाऱ्यांवर एफडीएने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

गेल्या तीन महिन्यांत २३ ब्लडबँकआणि १५ ब्लड स्टोरेज सेंटरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आल्याने २१ ब्लडबँकांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर दोन ब्लडबँकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

एफडीएने अन्न व औषध सुरक्षेबरोबरच रक्तसुरक्षेच्या बाबतीतही कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

राज्यात सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी एफडीएची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अनियमितता आढळणाऱ्या कोणत्याही संस्थेला पाठीशी घातले जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

See also  चाकण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!