तडीपाराचा आदेश धाब्यावर! चिखलीत कोयत्यासह आरोपी जेरबंद; शहराच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

काशिनाथ शिंदे  पिंपरी चिंचवड

तडीपारीचा आदेश असतानाही बिनधास्तपणे पिंपरी-चिंचवड शहरात वावर करणाऱ्या सराईत आरोपीला चिखली पोलिसांनी कोयत्यासह अटक केली आहे. स्पाइन रोडवरील जॉगर्स पार्क परिसरात संशयास्पद हालचाली करत असलेल्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेला आरोपी २८ वर्षीय असून, त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, संबंधित आदेशाचे उल्लंघन करून तो पुन्हा शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चिखली पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

झडतीदरम्यान आरोपीच्या ऑटो रिक्षामधून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. तसेच आरोपीची ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून, एकूण सुमारे ५०हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

तडीपारीचा आदेश लागू असतानाही आरोपी शहरात कसा दाखल झाला, तो घातक शस्त्रासह नेमक्या कोणत्या उद्देशाने परिसरात फिरत होता आणि त्यामागे आणखी कोणते गुन्हेगारी नियोजन होते का, या सर्व बाबींचा चिखली पोलीस सखोल तपास करत आहेत.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

See also  आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!