टॉयलेटची भिंत फोडून ‘आराध्या ज्वेलर्स’वर डल्ला; ‘मनी हाईस्ट’ स्टाईल चोरीने पुणे हादरले!

काशिनाथ शिंदे  पुणे

पुण्यातील हडपसर-मांजरी परिसरात चोरट्यांनी अत्यंत शिताफीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने सराफा दुकानावर दरोडा टाकत कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केला. टॉयलेटची मागील भिंत फोडून दुकानात प्रवेश करत चोरीची ही धाडसी घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना मांजरी-मुंढवा रस्त्यावरील म्हसोबा वस्ती येथील आराध्या ज्वेलर्स या दुकानात घडली. चोरट्यांनी दुकानाच्या शेजारी असलेल्या सुरक्षारक्षकाच्या खोलीतून प्रवेश करत दुकानाच्या टॉयलेटच्या मागील भिंतीला सुमारे दीड फूटाचे भगदाड पाडले. या भगदाडातून दुकानात प्रवेश करून त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराला हात न लावता चोरीचा संपूर्ण डाव यशस्वी केला.

दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. प्राथमिक माहितीनुसार, चोरीचा मुद्देमाल कोट्यवधी रुपयांचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची मोजणी सुरू असून त्यानंतरच अधिकृत आकडा स्पष्ट होणार आहे.

सकाळी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुकानातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने मालकाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून श्वानपथक, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि परिसरातील हालचालींचा तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या धाडसी चोरीमागे सराईत चोरट्यांची टोळी असल्याचा पोलिसांना संशय असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेमुळे पुण्यातील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापाऱ्यांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.

See also  भव्य महा-जनआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशनच्या वतीने १० सप्टेंबरला नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!