पिसोळीतील फार्महाऊसवर काळेपडळ पोलिसांचा धडक छापा; अवैध हुक्का पार्टी उद्ध्वस्त, तब्बल ₹७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त!

 

काशिनाथ शिंदे

पुणे शहरातील अवैध हुक्का व्यवसायावर काळेपडळ पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत पिसोळी येथील एका फार्महाऊसवर सुरू असलेली बेकायदेशीर हुक्का पार्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत तीन चारचाकी, दोन दुचाकी, १२ मोबाईल, आठ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण ₹७५,८०,७३९ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे शहरात अवैध धंदे, तडीपार आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगार व बेकायदेशीर कृत्यांवर विशेष मोहीम सुरू असताना काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली. पोलीस अंमलदार महादेव शिंदे व अतुल पंधरकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पिसोळी येथील आंबिका हॉटेल रोड, जगदंबा मार्गाजवळील एका फार्महाऊसमध्ये अनिस सय्यद व साद सय्यद हे अवैधरित्या चोरीछुप्या पद्धतीने हुक्क्याची विक्री करून ग्राहकांना हुक्का पाजत असल्याचे समोर आले.

माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी ८ ते १० जण अनधिकृतपणे हुक्का पित असल्याचे आढळून आले. सर्वांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून तीन चारचाकी, दोन दुचाकी, १२ मोबाईल फोन, आठ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण ₹७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम, २०१८ मधील कलम ४-अ व २१-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-६ जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक रघुवीर खोडा तसेच तपास पथकातील प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहीद शेख, निलेश देसाई, अमोल फडतरे, अतुल पंधरकर, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे, नंदकुमार जावळे, ज्ञानेश्वर कुलाळ, अक्षय जगताप, शुभम पवार आणि मेघराज जाधव यांनी संयुक्तपणे पार पाडली. या धाडसी कारवाईबद्दल पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

See also  मुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!