युनिट ३ ची भन्नाट कामगिरी! १२ तासांत १४ लाखांच्या ‘बोगस’ घरफोडीचा पर्दाफाश

 

 

 

 

 

तपासकौशल्याच्या जोरावर पत्नीचा बनाव उघड; दागिने विकले जाऊ नयेत म्हणून रचला होता कट

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड  : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १३ लाख ९८ हजार ९७८ रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ ने अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. तपासात हा प्रकार सराईत चोरट्याने केलेली घरफोडी नसून, पतीने दागिने विकू नयेत म्हणून पत्नीनेच दागिने लपवून घरफोडीचा बनाव रचल्याचे उघडकीस आले.

दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ (अ) अन्वये गुन्हा क्रमांक ६२१/२०२६ दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.

सीसीटीव्ही तपासले; संशयाची दिशा बदलली

तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, तसेच पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे आणि दिलीप राठोड यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्याचबरोबर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात आले.

बिल्डिंगमध्ये बाहेरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीची संशयास्पद हालचाल आढळून आली नाही. परिसरातील रहिवाशांकडे चौकशी करूनही घरफोडी करणाऱ्या व्यक्तीबाबत ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिसांचा संशय तक्रारदाराच्या घरातील व्यक्तींकडे वळला.

सखोल चौकशीसमोर बनावाचा पडदा फाटला

तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे आणि पोलीस अंमलदार युवराज बिराजदार यांनी फिर्यादीच्या पत्नीची विश्वासात घेऊन बारकाईने चौकशी केली. पोलिसांच्या अभ्यासपूर्ण चौकशीदरम्यान तिने अखेर या प्रकारामागील सत्य सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

पती नवीन घर खरेदी करण्यासाठी घरातील सोन्या-चांदीचे दागिने विकणार असल्याची माहिती पत्नीला होती. दागिने विकले जाऊ नयेत म्हणून तिने ते घरातच लपवून ठेवले आणि घरफोडी झाल्याचा बनाव रचला, असे तपासात समोर आले.

See also  मोशी कचरा डेपो मृत्यू प्रकरण तापलं! दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन

पोलिसांनी पंचांसमक्ष घरात लपवून ठेवलेले १३ लाख ९८ हजार ९७८ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. त्यामुळे अवघ्या काही तासांतच कथित घरफोडीमागील सत्य उघड झाले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, दिलीप राठोड, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे आणि स्वप्निल महाले यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासाचे कौतुक होत आहे. पुढील तपास दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.

  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर