ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : चेतन पवार

पिंपरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार आंदोलन; एसआयआर रद्द करण्याचीही मागणी

काशिनाथ शिंदे

पिंपरी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश कुमार यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहरप्रमुख चेतन पवार यांनी केली.

शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलन झाले. आंदोलकांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार याद्यांमधील बदल आणि विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर यावेळी जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला.

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, अशोक वाळके, रोमी संधू, अनिता तुतारे, कल्पना शेटे, ज्ञानेश्वर शिंदे, गौरी घंटे, वैशाली कुलथे, रावसाहेब थोरात, अनिल सोमवंशी, पांडुरंग पाटील, नितीन बोंडे, पार्थ गुरव, किरण दळवी, अमोल भालेकर, गणेश आहेर, गणेश पाकुळे, दिलीप दंडवते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मतदार याद्यांमधील बदल आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येतील वाढ हा केंद्राचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत सुमारे ७२ हजार मतांची वाढ झाल्याचा दावा करत मतदार याद्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांबाबत निवडणूक आयोगाने यापूर्वी विविध स्पष्टीकरणे दिली आहेत.

यावेळी रावसाहेब थोरात, अशोक वाळके, तुषार नवले, अनिल सोमवंशी आणि अनिता तुतारे यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक प्रक्रिया केंद्रीकृत करण्यास विरोध करत विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

See also  माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

दरम्यान, एसआयआरच्या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाची बैठक झाली असून महाराष्ट्रातील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आल्याचे वृत्त आहे.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश