विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा : आर. जी. जाधव

जनहित फाउंडेशनकडून गुणवंत विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

 काशिनाथ शिंदे

पिंपरी : विद्यार्थिदशेत मिळणारे गुण महत्त्वाचे असले, तरी भविष्यातील ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे. ध्येय स्पष्ट असेल तर अभ्यासाला दिशा मिळते आणि कष्ट करण्याची प्रेरणाही कायम राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून सातत्याने अभ्यास करावा तसेच आपल्या शिक्षणासाठी आई-वडील घेत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी, असा संदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयातील निवृत्त पर्यवेक्षीय अधिकारी आर. जी. जाधव यांनी दिला.

जनहित फाउंडेशनच्या वतीने चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रविवारी (दि. २७) विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते.

या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू भालेराव, शैलेश पाटील, मिलिंद सोनवणे, भाऊ नाईक, अॅड. निशिगंध करपे, हर्षकुमार महाडिक, महिंद्र निशिगंध, विक्रम निकम, हनीफ शेख तसेच माजी उपशिक्षणाधिकारी बुधा नाडेकर आदी उपस्थित होते.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे सहकार तज्ज्ञ अॅड. अजित बोराडे, विद्या जगनाडे, कल्याणी सनासे आणि स्नेहा मोरे यांचा गुलाबपुष्प, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक राजू कोंढावळे, सुनीता ताम्हाणे आणि धीरसिंग वसावे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी अनुष्का साबळे, प्रणव शिंदे, श्वेता अचमलवाड, प्रिया पवार, रितम रॉय आणि राम मुगदूम यांचाही सन्मान करण्यात आला.

जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता भविष्यातील ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करावे. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या दिनक्रमाचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासासाठी पुरेसा वेळ देता येतो. सातत्याने प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. मोबाईलचा अतिरेकी वापर हा अभ्यासातील मोठा अडथळा ठरू शकतो. त्यामुळे मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करून पुस्तक वाचनाची सवय विद्यार्थ्यांनी लावावी.

See also  दुष्काळी परिस्थितीत महावितरणचा अतिसतर्कतेचा इशारा!

वाढदिवस किंवा अन्य प्रसंगी अनावश्यक खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याची सवय पालकांनी लावावी. आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येऊ नये यासाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती, शैक्षणिक योजना आणि उपलब्ध सुविधांची माहिती घ्यावी. उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ घ्यावा. परिस्थिती कोणतीही असो, कष्ट करण्याची तयारी आणि सातत्य असेल तर विद्यार्थी निश्चितपणे पुढे जाऊ शकतो, असेही जाधव यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू भालेराव यांनी केले, तर सूत्रसंचालन सोमनाथ नाढे यांनी केले.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न