माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे लक्ष्य; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार

काशिनाथ शिंदे

पिंपरी : माथाडी कामगार संघटना अधिक बळकट करण्यासह कामगारांच्या रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाच्या प्रश्नांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने चिंचवड येथे राज्यस्तरीय पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २९) ऑटो क्लस्टर येथे होणाऱ्या या महामेळाव्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

याबाबतची माहिती माथाडी ट्रान्सपोर्टचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी (दि. २७) काळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महामेळाव्याचे उद्घाटन रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी २ वाजता होणार आहे. माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे. कामगारांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच कामगारांच्या प्रलंबित समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर चर्चा होणार आहे.

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघटनात्मक विस्तार, पदाधिकाऱ्यांचे जाळे मजबूत करणे आणि कामगारांपर्यंत संघटनेचे कार्य पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजनावरही महामेळाव्यात चर्चा होणार असल्याचे अनुप मोरे यांनी सांगितले.

रोजगार महाकुंभातून युवकांना नोकरीची संधी

या महामेळाव्याच्या निमित्ताने बेरोजगार युवकांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध नामांकित उद्योग व कंपन्यांचे प्रतिनिधी या रोजगार महाकुंभात सहभागी होणार आहेत. पात्र उमेदवारांना जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पाचवी उत्तीर्ण उमेदवारांपासून उच्चशिक्षित युवकांपर्यंत त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मेळाव्यात सहभागी होऊनही तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

See also  १३ वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर दरोड्यातील फरार आरोपी बुलढाण्यात जेरबंद!
  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश