“भर रस्त्यात गुन्हेगारांची धिंड! भारती विद्यापीठ पोलिसांचा धडाकेबाज अॅक्शन; ‘गुन्हा कराल तर सुटका नाही’चा स्पष्ट इशारा!”

काशिनाथ  शिंदे पुणे

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याने गुन्हेगारीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भर रस्त्यात धडक कारवाई करत सराईत आणि संशयित गुन्हेगारांना कायद्याचा जबरदस्त धाक दाखवला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना थेट इशारा देण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांची कसून तपासणी करत सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या मोहिमेतून दिला.

भर रस्त्यात पोलिसांनी दाखविलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे. पोलिसांच्या या ठोस भूमिकेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. “गुन्हेगारांना कायद्याचा धाक आणि नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास” हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

See also  विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेसाठी सामाजिक बांधिलकी जपा!
  • Related Posts

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता; त्यापुढील प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी आवश्यक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभागस्तरावरील स्थानिक विकासकामांना गती देण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर