मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यास युद्धपातळीवर वेग; ९ कर्मचारी सुखरूप, उर्वरितांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न”

काशिनाथ शिंदे                    पिंपरी-चिंचवड

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्याला युद्धपातळीवर वेग देण्यात आला असून, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संबंधित यंत्रणांकडून सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ९ कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारतीय सेना, अग्निशमन दल, एनडीआरएफ, महापालिका, पोलीस प्रशासन तसेच इतर सर्व संबंधित यंत्रणा रात्रंदिवस अथक प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, महापौर रवि लांडगे यांनी बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवले असून प्रत्येक क्षण परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले. “उर्वरित सर्व कर्मचारीही सुखरूप बाहेर येतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. पांडुरंगाच्या कृपेने प्रत्येक जीव सुरक्षित राहावा आणि प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा, हीच प्रार्थना आहे,” असे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याची विनंती केली आहे. संपूर्ण यंत्रणा बचावकार्य यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत असून प्रत्येक जीव सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

See also  गणेशोत्सवासाठी कोकणात जादा एसटी बस सोडा; खेड युवाशक्तीची मागणी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!