विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेसाठी सामाजिक बांधिलकी जपा!

लहान मुलांमध्ये जनजागृतीचे दूरगामी परिणाम; महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

काशिनाथ शिंदे

पुणे : महावितरणच्या दैनंदिन कामकाजासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती असलेली बांधिलकी जपून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. विशेषतः लहान मुलांमध्ये विद्युत सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेबाबत जनजागृती केल्यास त्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यामुळे आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजहितासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले.

गणेशोत्सवानिमित्त पेशवेपार्क उपविभागातील दत्तवाडी शाखेत आजी-माजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने ‘गणेशोत्सवानिमित्त स्नेहसंमेलन व विशेष गौरव पुरस्कार सोहळा–२०२६’ आयोजित करण्यात आला होता. शनिवारी (दि. १९) उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात कर्मचारीहित, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या योगदानाबद्दल राजेंद्र पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महावितरणच्या विकासामध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या कार्यातून संस्थेच्या प्रगतीला हातभार लावताना ग्राहकसेवा आणि सामाजिक बांधिलकीलाही प्राधान्य द्यावे, असे पवार यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्थापत्य विभागाशी संबंधित आवश्यक कामे मार्गी लावण्यासाठी मानव संसाधन विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या अभियंत्यांचा गौरव

वीज सुरक्षा, वीज बचत आणि हरित ऊर्जेबाबत अंध विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्याबद्दल डहाणूकर शाखेचे सहायक अभियंता अतुल धांडोरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच भोसरी विभागात एकाच वेळी तब्बल ५ हजार ३४५ विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल इंद्रायणीनगर शाखेचे सहायक अभियंता विशाल नाईकनवरे यांनाही राजेंद्र पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी ‘कर्मचारी आरोग्य सेवा गौरव’ पुरस्कार मेडी असिस्टचे अमित गायकवाड यांना, तर ‘स्वच्छता व सुशोभीकरणातील उत्कृष्टता गौरव’ पुरस्कार स्थापत्य विभागाला प्रदान करण्यात आला.

धोक्याची ध्वनीद्वारे सूचना देणारी अभिनव यंत्रणा

See also  मंजुरी मिळूनही स्मशानभूमीचे काम ठप्प; पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले

दरम्यान, जनमित्र महादेव चांगिरे आणि अय्युब देशमुख यांनी विद्युत धक्का अथवा संभाव्य विद्युत धोका निर्माण झाल्यास ध्वनीच्या माध्यमातून इशारा देणारी अभिनव यंत्रणा विकसित केली आहे. कार्यक्रमात या यंत्रणेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या नवकल्पनेचे राजेंद्र पवार यांनी कौतुक केले. तसेच यंत्रणेमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमास प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांच्यासह महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच आजी-माजी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक