वीज ग्राहकांच्या तक्रारी आता थेट अधिकाऱ्यांसमोर; महावितरणचे ‘ग्राहक समाधान शिबिर’ सोमवारी

पुणे परिमंडलातील सर्व ५२ उपविभागीय कार्यालयांत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजन; तक्रारींच्या जागेवरच निवारणावर भर

काशिनाथ शिंदे

पुणे: वीज ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे स्थानिक पातळीवर तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलात दुसरे ‘ग्राहक समाधान शिबिर’ सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. पुणे परिमंडलातील सर्व ५२ उपविभागीय कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

वीजबिलातील त्रुटी, वीजपुरवठ्यातील अडचणी, मीटरची समस्या, नवीन वीजजोडणी तसेच महावितरणच्या विविध सेवा आणि योजनांबाबतच्या तक्रारी ग्राहकांना थेट संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. शक्य त्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यावर महावितरणचा भर राहणार आहे.

पुणे परिमंडलात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘ग्राहक समाधान शिबिर’ आयोजित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून ग्राहक आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात थेट संवादाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

पहिल्या शिबिराला १,२९३ ग्राहकांचा प्रतिसाद

यापूर्वी झालेल्या पहिल्या शिबिराला पुणे परिमंडलातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या शिबिरात तब्बल १,२९३ ग्राहकांनी सहभाग घेतला, तर विविध समस्यांबाबत ७४४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६८४ अर्जांचा शिबिरातच निपटारा करण्यात आला. उर्वरित प्रलंबित अर्जांवरही कार्यवाही पूर्ण करून तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

ग्राहकांनी तक्रारींसह सहभागी व्हावे

वीजबिल, मीटर, वीजपुरवठा, वीजजोडणी अथवा महावितरणच्या इतर सेवांशी संबंधित समस्या असलेल्या ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

See also  तडीपाराचा आदेश धुडकावला अन् थेट गुन्हे शाखेच्या जाळ्यात! सराईत गुन्हेगाराला युनिट-३ची अचूक कारवाई
  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात