महावितरणमध्ये आता ‘बघतो-करतो’ नाही; थेट रिझल्ट पाहिजे!

१० दिवसांत तब्बल ६८२ कोटींची वसुली करण्याचे लक्ष्य; दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा

काशिनाथ शिंदे

पुणे: महावितरणच्या कामकाजात आता केवळ आश्वासने आणि नियोजन चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे. ‘बघतो’, ‘करतो’, ‘पुढच्या महिन्यात होईल’ अशी उत्तरे आता खपवून घेतली जाणार नाहीत. कामाचा रिझल्ट दिसला पाहिजे; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महावितरणचे कार्यकारी संचालक (वाणिज्य) दिनेश अग्रवाल यांनी पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.

पुणे व बारामती परिमंडलाचे पालकत्व कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पालक संचालक म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी (दि. १९) रास्तापेठ येथील पॉवर हाऊस येथे पुणे परिमंडलातील वसुली, वीज गळती आणि एकूण कामगिरीचा आढावा घेतला.

या बैठकीला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (वि.व ले.) कीर्ती भोसले यांच्यासह पुणे परिमंडलातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते आणि अधिकारी उपस्थित होते.

१० दिवसांत ६८२ कोटी वसुलीचे आव्हान

सप्टेंबर महिन्याच्या चालू देयकासह पुणे परिमंडलाला एकूण १ हजार २५४ कोटी रुपयांची वसुली करणे अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत ५७१ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे अद्याप ६८२ कोटी रुपये वसूल करणे बाकी आहे.

ही संपूर्ण थकबाकी पुढील १० दिवसांत वसूल करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक विभागाने उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून त्याचा प्रत्यक्ष परिणाम दाखवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

‘आपल्या व्यवसायासारखी महावितरणची जबाबदारी घ्या’

“आपला स्वतःचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी ज्या तळमळीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपण प्रयत्न करतो, त्याच भावनेने महावितरणच्या उत्कर्षासाठी काम करा. शंभर टक्के वसुलीसोबतच वीज गळती कमी करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करा. त्यानुसार कामाचे नियोजन करून निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करा,” असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

See also  वीज ग्राहकांच्या तक्रारी आता थेट अधिकाऱ्यांसमोर; महावितरणचे ‘ग्राहक समाधान शिबिर’ सोमवारी

वीजचोरांविरोधातील मोहीम तीव्र करण्याचे निर्देश

वसुलीबरोबरच वीजचोरांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे निर्देशही अग्रवाल यांनी दिले. ग्राहकसेवा, वीजपुरवठ्याची गुणवत्ता, वसुली आणि वीज गळती कमी करण्याच्या कामात ठोस परिणाम दिसला पाहिजे.

केवळ कागदावर नियोजन न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी करून अपेक्षित परिणाम साध्य झाले पाहिजेत. ‘बघतो-करतो’च्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कामगिरी दाखवा, असा स्पष्ट संदेश अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना दिला.

  • Related Posts

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक