ज्ञान देणाऱ्या हातांनी केली उन्नतीच्या गणरायाची आरती!

पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांचा विशेष सन्मान; सामाजिक समावेशकतेची उन्नती सोशल फाऊंडेशनची परंपरा कायम

काशिनाथ शिंदे

पिंपळे सौदागर | गणेशोत्सव २०२६

पिंपरी-चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्नती सोशल फाऊंडेशनच्या ‘उन्नतीच्या गणरायाची’ यंदाची गणेशोत्सवाची वाटचाल भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या संगमातून सुरू आहे. पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलमधील महिला शिक्षकांच्या शुभहस्ते गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली.

विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांच्यामध्ये ज्ञान, संस्कार, शिस्त आणि जीवनाची योग्य दिशा रुजविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष प्रसंग ठरला.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी गणरायाच्या आरतीचा मान समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि घटकांना दिला जातो. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचा सन्मान करणारा उत्सव ठरावा, या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो.

यापूर्वी उन्नतीच्या गणरायाच्या आरतीचा मान सफाई कामगार, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, तृतीयपंथी बांधव यांच्यासह समाजातील विविध घटकांना देण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारी ही परंपरा परिसरात विशेष ठरत आहे.

‘सर्वांच्या सहभागातून समाजाची उन्नती’ हा संदेश

यावेळी बोलताना उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “उन्नतीचा गणपती हा केवळ उन्नती सोशल फाऊंडेशनचा गणपती नसून पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील सर्व नागरिकांच्या श्रद्धेचा व आपुलकीचा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान व्हावा, ही आमची भूमिका आहे.

दरवर्षी गणरायाच्या आरतीचा मान वेगवेगळ्या क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. काही दिवसांपूर्वी सफाई कामगारांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली होती. यंदा विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि दिशा देणाऱ्या महिला शिक्षकांच्या हस्ते आरती करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्हाला आनंद आहे.”

See also  स्मार्ट मीटरला हात लावणे पडले महागात!

“गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, परस्पर सन्मान आणि ‘सर्वांच्या सहभागातून समाजाची उन्नती’ हा संदेश देण्याचा उन्नती सोशल फाऊंडेशनचा सातत्याने प्रयत्न आहे,” असेही डॉ. भिसे यांनी सांगितले.

दरम्यान, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री गणेश महापूजा व महाप्रसाद, तसेच पिंपळे सौदागर, रहाटणी आणि परिसरातील विविध रहिवासी सोसायट्यांमधील ढोल-ताशा व लेझीम पथकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जोड मिळणार आहे.

  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक