स्मार्ट मीटरला हात लावणे पडले महागात!

 

भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणचा फौजदारी कारवाईचा बडगा

सील तोडून ‘सीटी बायपास’;प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी, १० प्रकरणे कारवाईच्या रडारवर

काशिनाथ शिंदे

पुणे,  स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोसरी परिसरातील १९ वीजग्राहकांना महावितरणने चांगलाच दणका दिला आहे. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच ‘सीटी बायपास’ करून मीटरची गती कमी दाखविण्याचा प्रकार तपासणीत उघडकीस आला. याप्रकरणी ९ ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित १० प्रकरणांतही दंडाची आकारणी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महावितरणच्या भोसरी, आकुर्डी तसेच प्राधिकरण (देयकेमहसूल) उपविभागात स्मार्ट मीटर तपासणीदरम्यान हे प्रकार समोर आले. वीजचोरी करण्यासाठी मीटरच्या यंत्रणेत केलेली चलाखी महावितरणच्या स्मार्ट तपासणी यंत्रणेने हेरली. मीटरचे सील तोडून त्याचे कव्हर उघडणे आणि सीटी प्रणालीला बगल देऊन प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी वीजवापर नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

चाऱ्होलीतील रेस्टॉरंटमध्ये थेट रिमोट उपकरण!

चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणी तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळली. स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने महावितरणने या प्रकरणात कठोर कारवाई केली.

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड? थेट गुन्हा!

मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे, सीटी बायपास करणे किंवा मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजवापर कमी दाखविण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणांत भारतीय विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे.

See also  चाकणमध्ये गांजासह तरुणाला अटक; गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई

दिघी, कासारवाडी, रावेत पोलीस ठाण्यात गुन्हे

महावितरणच्या कारवाईत खालील ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे—

शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली — २ लाख ६६ हजार ८०० रुपये

सचिन भास्करराव तायडे — १ लाख १८ हजार ३६० रुपये

सुरज संजीवकुमार सूर्यवंशी — १ लाख ५३ हजार ७७० रुपये

दयानंद श्रीमंत रसाळ — १ लाख ४६ हजार ७० रुपये

संदीप लक्ष्मण गवळी — १ लाख ५६ हजार ५९० रुपये

विष्णू सखाराम चोपडे — १ लाख ४० हजार ४१० रुपये

भगवत नारायण इंगळे — १ लाख ४६ हजार ६५० रुपये

आनंद जी. — ६८ हजार ८६३ रुपये

ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे — ४३ हजार ६२२ रुपये

स्मार्ट मीटरमुळे वीजचोरीच्या पारंपरिक पद्धतींवर नियंत्रण येत असतानाच, तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवरही महावितरणने लक्ष केंद्रित केले आहे. वीजचोरी रोखण्यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणाऱ्यांवर दंडासोबत फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!