धार्मिक संस्कारांची अनोखी शिकवण; सिद्धिविनायक स्कूलची पालखी उत्साहात

काशिनाथ शिंदे :चिखली

चिखली : आषाढी एकादशीचे औचित्य साधत चिखलीच्या मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक संस्कारांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये संतपरंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

पालखी सोहळ्याची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून झाली. संस्थेचे सचिव मारुती जाधव, अध्यक्षा निर्मला जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. तसेच महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीवर आधारित विविध देखावे सादर करण्यात आले. शाळेच्या लेझीम पथकाने आणि ढोल पथकाने पालखी सोहळ्याची शोभा अधिक वाढविली.

पालखी मार्गावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक फुगडी खेळत वारकरी संस्कृतीचा आनंद लुटला. शाळेपासून सुरू झालेली पालखी मोरे वस्ती, साने चौक, म्हेत्रे गार्डन आणि म्हेत्रे वस्ती या मार्गाने पुन्हा शाळेच्या प्रांगणात दाखल झाली. संपूर्ण मार्गावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम अशा नामघोषाने परिसर भक्तिमय झाला. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले.

See also  प्रियकरासोबत राहणारी पत्नी डोळ्यात खुपली; पतीने डोक्यात दगड घालून संपवले!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!