कॉपर वायर चोरट्याला एलसीबीचा दणका! सराईत आरोपी जाळ्यात; ९ चोरीचे गुन्हे उघड, २.५० लाखांची रोकड जप्त

काशिनाथ शिंदे  लातूर

लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत कॉपर वायर व डीसी केबल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या मालाच्या विक्रीतून मिळालेली २ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, प्राथमिक चौकशीत त्याने लातूरधाराशिव जिल्ह्यातील तब्बलचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याने अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना विशेष पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार, १२ जुलै रोजी हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या विकास विलास जाधव (वय ४०, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पिशवीची झडती घेतली असता २ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळून आली.

चौकशीत ही रक्कम चोरी केलेल्या कॉपर वायर व डीसी केबल विक्रीतून मिळाल्याची आरोपीने कबुली दिली. तसेच सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या साथीने ओमनी कार व रिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहरातील इलेक्ट्रिकल दुकाने, गोदामे व इतर ठिकाणांहून कॉपर वायर व डीसी केबल चोरी केल्याची माहितीही समोर आली.

तपासादरम्यान आरोपीने औसा पोलीस ठाण्याचे तीन, चाकूरचे दोन, गांधी चौक पोलीस ठाण्याचा एक तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग आणि शिराढोण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा एकूणगुन्ह्यांची कबुली दिली आहे.

जप्त करण्यात आलेली रोकड ही चोरीतील माल विक्रीतून मिळाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच चोरीतील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

See also  🌺 आध्यात्म, समाजसेवा आणि उद्योग क्षेत्राचा प्रेरणादायी संगम!

आरोपीला औसा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ५०६/२०२५ मध्ये मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास औसा पोलीस करीत आहेत.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!