“इराणी टी कॅफेचा धक्कादायक कारनामा! एक्स्पायरी दूध वापरून चहा, कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा; FDA ची धडक कारवाई”

काशिनाथ शिंदे पुणे

कोंढवा  खुर्द येथील एनआयबीएम रोडवरील इराणी टी कॅफेमध्ये मुदत संपलेले (एक्स्पायरी) दूध, शीतपेये तसेच इतर कालबाह्य खाद्यपदार्थांचा साठा करून त्यांचा वापर व विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने संबंधित कॅफेवर धडक कारवाई करत विविध खाद्यपदार्थ जप्त केले.

प्राथमिक तपासात मुदत संपलेल्या दुधाचा वापर चहा तयार करण्यासाठी केला जात असल्याची बाब उघड झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कालबाह्य शीतपेये आणि इतर खाद्यपदार्थही कॅफेमध्ये साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, या कारवाईसंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, संबंधित प्रकरणाचा अधिक तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.

नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख तपासूनच वापर करावा, तसेच अशा प्रकारची माहिती आढळल्यास तातडीने प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  न्यायाधीश वाढले... पण न्यायालय अजूनही सुविधांच्या प्रतीक्षेत!; मोरवाडी न्यायालयात कर्मचारी, अभियोक्ते आणि मूलभूत सुविधांचा तीव्र तुटवडा
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!