चाकण पोलिसांचा अमली पदार्थांवर घणाघात! ८ किलो गांजासह एक जेरबंद; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त, मुख्य पुरवठादार फरार

काशिनाथ शिंदे चाकण

चाकण परिसरात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चाकण दक्षिण पोलिसांनी धडक कारवाई करत ८ किलो २९० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ४ लाख १४ हजार ६०० रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

ही कारवाई १० जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास नाणेकरवाडी (ता. खेड) येथील जीएमपी ऑटो कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून संशयित दिलीप मधुकर शिंदे (सध्या रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. अंतरवाली टेंभी, ता. घनसावंगी, जि. जालना) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ८ किलो २९०ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत हा गांजा समीर तडवी याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दिलीप शिंदे आणि समीर तडवी या दोघांविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्य पुरवठादार समीर तडवी हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसउपनिरीक्षक मोते करीत आहेत.

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चाकण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध अमली पदार्थांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

See also  कॉपर वायर चोरट्याला एलसीबीचा दणका! सराईत आरोपी जाळ्यात; ९ चोरीचे गुन्हे उघड, २.५० लाखांची रोकड जप्त
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!