१५ तास मृत्यूशी झुंज… ‘जिवंत आमिष’ बनून नरभक्षक वाघिणीला जेरबंद; डॉ. प्रियल चौरागडे यांच्या धाडसाला सलाम!

काशिनाथ शिंदे नागपूर

उमरेड (नागपूर) : उमरेड वनपरिक्षेत्रात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी नागपूरच्या धाडसी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल चौरागडे यांनी जीवाची पर्वा न करता थरारक मोहिम यशस्वी केली. तब्बल १५ तास पिंजऱ्यात ‘जिवंत आमिष’ बनून बसत, त्यांनी अतुलनीय धाडस आणि संयमाचे दर्शन घडवले.

वन विभागाने आखलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वाघिणीला जेरबंद करण्यासाठी डॉ. चौरागडे यांनी अत्यंत मर्यादित जागेतून जीव धोक्यात घालून पिंजऱ्यात स्थान घेतले. समोर मृत्यूचे सावट असतानाही त्यांनी अजिबात धीर सोडला नाही. योग्य क्षण साधत त्यांनी अचूक डार्ट फेकून वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने वाघिणीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

या संपूर्ण कारवाईत डॉ. प्रियल चौरागडे यांनी दाखवलेले धैर्य, संयम आणि कर्तव्यनिष्ठा याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

डॉ. प्रियल चौरागडे यांच्या या अद्वितीय धाडसामुळे त्या आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या असून, अनेकांकडून त्यांना “महाराष्ट्राची वाघीण” अशी गौरवपूर्ण उपाधी देत सलाम केला जात आहे.

See also  शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!