“‘दम असेल तर चाकू काढ’ म्हणत तरुणावर जीवघेणा हल्ला; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी जेरबंद”

काशिनाथ शिंदे पिंपरी

चिंचवडमधील मोहननगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट चाकूहल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात चिंचवड पोलिसांनी आदित्य गायकवाड (वय १९, रा. काळभोर नगर, चिंचवड) याला अटक केली असून, त्याच्यासोबत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री इंडस्ट्रीसमोर, सेंट अँड्र्यूज स्कूलजवळ फिर्यादी शंकर कृष्णा कापले हे मित्रांसोबत उभे असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली.

वाद अधिक चिघळल्यानंतर आरोपींनी “तुझ्यात दम असेल तर चाकू काढ” असे आव्हान देत जवळील चाकू काढून फिर्यादीच्या मित्राच्या पाठीवर वार केला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचाही पाठलाग करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

या घटनेनंतर चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आदित्य गायकवाड याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत करीत आहेत.

घटनेमुळे मोहननगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

See also  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी; अश्वारूढ शिवरायांसह ‘कटिबद्ध जनहिताय’चा संदेश
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!