स्वतःच्या रिक्षातच गळफास; आकुर्डीत रिक्षाचालकाची धक्कादायक आत्महत्या, कारण अद्याप गूढ!

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात एका रिक्षाचालकाने स्वतःच्या ऑटो रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृत रिक्षाचालकाचे नाव प्रमोद साळुंखे (वय अंदाजे ३२) असे असून ते चाकणमधील आंबेठाण परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील सुखवानी हेरिटेज इमारतीसमोर उभी असलेल्या त्यांच्या रिक्षामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

शनिवारी सकाळच्या सुमारास रिक्षामध्ये संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती दिसताच स्थानिक नागरिकांनी तातडीने निगडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता, प्रमोद साळुंखे यांनी स्वतःच्या शर्टाच्या सहाय्याने रिक्षामध्येच गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, प्रमोद साळुंखे यांनी इतके टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

See also  तडीपार असूनही शहरातच ठिय्या! गुन्हे शाखेच्या युनिट-३ने तिघांना उचलले
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!