मीमांसा’मुळे व्यावसायिक जगाचा प्रत्यक्ष अनुभव : डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएमच्या राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंजची पहिली फेरी पूर्ण; देशभरातील ४८ संघांचा सहभाग

काशिनाथ शिंदे

पिंपरी: व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष व्यावसायिक जगातील आव्हाने, गुंतागुंत आणि अनिश्चिततेचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये विश्लेषणात्मक व धोरणात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते. याच उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (एसबीपीआयएम) वतीने राष्ट्रीय पातळीवरील ‘मीमांसा २०२६’ बिझनेस केस चॅलेंज आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी दिली.

एसबीपीआयएम येथे आयोजित ‘मीमांसा २०२६’च्या पहिल्या ऑनलाइन फेरीला देशभरातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४८ संघांनी सहभाग घेतला. पुणे, मुंबई, बंगळूर, सुरत, ग्रेटर नोएडा, नाशिक, अकोला, अकोट आणि धुळे यांसह महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

‘मीमांसा २०२६’च्या माध्यमातून व्यवस्थापन शिक्षण आणि वास्तविक व्यावसायिक आव्हाने यांच्यात अर्थपूर्ण दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पारंपरिक चौकटीच्या पलीकडे विचार करण्यास, व्यावसायिक समस्यांवर नाविन्यपूर्ण व व्यावहारिक उपाय शोधण्यास आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणातील अनिश्चिततेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास या स्पर्धेतून प्रोत्साहन मिळाले.

स्पर्धेत सहभागी संघांना तज्ज्ञांच्या प्रतिष्ठित समितीसमोर आपले उपाय सादर करण्याची संधी मिळाली. विश्लेषणात्मक विचार, समस्या निराकरण, धोरणात्मक निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि प्रभावी व्यावसायिक संवाद या व्यवस्थापकीय कौशल्यांच्या विकासावर स्पर्धेत विशेष भर देण्यात आला.

पहिल्या फेरीचे मूल्यांकन उद्योग व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीने केले. बाह्य तज्ज्ञ समितीत ज्येष्ठ मानव संसाधन व व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. कॅप्टन सी. चितळे, सिमेन्स कंपनीचे माजी महाव्यवस्थापक डॉ. सुबोध संत, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व समूह संचालक डॉ. शैलेश कासंदे, व्हीटन ॲडव्हायझर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर देशमुख, विपणन व्यवस्थापन क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ प्रा. डॉ. मिलिंद मराठे आणि निकमारचे वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. अतुल फेगडे यांचा समावेश होता.

See also  सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प

अंतर्गत तज्ज्ञ समितीत डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. भूषण परदेशी, डॉ. रूपाली कुदरे, डॉ. शिवाजी देसाई, डॉ. अनिशकुमार कारिया, डॉ. काजल महेश्वरी आणि डॉ. संतोष शिंदे यांनी सहभाग घेतला. समितीने कॉर्पोरेट नेतृत्व, मानव संसाधन, वित्त, विपणन, उच्च शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विविध दृष्टिकोनातून सहभागी संघांच्या सादरीकरणांचे परीक्षण केले.

अंतिम फेरी ३० सप्टेंबरला

‘मीमांसा २०२६’ची अंतिम फेरी ३० सप्टेंबर २०२६ रोजी पीसीईटी कॅम्पसमधील एसबीपीआयएम येथे ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आयोजनासाठी डॉ. संजय गायकवाड, डॉ. पद्मलोचना बिसोयी, डॉ. विशाल वाघ आणि डॉ. इराम अन्सारी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी केले, तर आभार प्रा. सोनाली मोहिते यांनी मानले.

  • Related Posts

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    एसबीपीआयएममध्ये ‘आरंभ’ कार्यक्रमांतर्गत चर्चासत्र संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : “मानव संसाधन आणि मनुष्यबळ विकास हे क्षेत्र लोक आणि संस्कृतीशी संबंधित आहे. मानव संसाधन म्हणजे…

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    मानव संसाधन हे लोक आणि संस्कृतीशी संबंधित क्षेत्र – चैत्राली पाटेकर

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी