सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प

गुरुचरणी गुरुदक्षिणा म्हणून सेवाकार्याचा निर्धार; थेरगाव केंद्रात उत्साहात सोहळा संपन्न

काशिनाथ शिंदे पिंपरी

थेरगाव  परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने थेरगाव केंद्रात आदरणीय सतिशदादा मोटे  यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी गुरुकन्या आदरणीय पल्लवीताई मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाची सुरुवात श्रीरामरक्षा पठणाने झाली. त्यानंतर आदरणीय पल्लवीताई मोटे यांच्या शुभहस्ते सतिशदादा मोटे यांचे औक्षण करण्यात आले. स्थानिक तसेच विविध तालुक्यांतून उपस्थित झालेल्या सेवेकऱ्यांनी यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले.

 

अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सेवेकऱ्यांनी केवळ शुभेच्छा न देता स्वामी कार्याला वाहून घेण्याचे विविध संकल्प केले. काही सेवेकऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस स्वामी कार्यासाठी देण्याचा, काहींनी नवीन केंद्र सुरू करण्याचा, तर काहींनी मार्गाचे अभ्यासक बनून प्रचारक व प्रसारक म्हणून कार्य करण्याचा निर्धार केला. हे संकल्पच गुरुदक्षिणा म्हणून गुरुचरणी अर्पण करण्यात आले.

 

यानंतर विविध सेवेकरी वर्गाच्या वतीने सप्रेम भेट म्हणून आणण्यात आलेले विविध ग्रंथ सतिशदादा मोटे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी सतिशदादांनी उपस्थितांना आशीर्वादपर अमृततुल्य मार्गदर्शन केले. स्वामी कार्याचा विस्तार आणि समाजोपयोगी उपक्रमांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

प्रत्येक केंद्रात परमपूज्य आई यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करणे, जागेच्या उपलब्धतेनुसार काही निवडक केंद्रांमध्ये गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीएमपीएससी अभ्यासिका सुरू करणे, तसेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या इच्छेनुसार केंद्रांमध्ये गाईंचे पालन करून गोसेवा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

या सोहळ्यास बीव्हीजीचे मालक  गायकवाड अशोक काका जाधव संन्यासी काका जोशी काका मोकाशी काका कुमरे काका तसेच ॲड. अजित बोराडे यांच्यासह मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते.

 

अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सेवेकऱ्यांनी प्रसादाचा आस्वाद घेतानाच सतिशदादांच्या मार्गदर्शनातून पुढील स्वामी कार्यासाठी आशीर्वाद आणि सेवाभावाची ऊर्जा ग्रहण केली. भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

See also  चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!