विद्यार्थ्यांनी ‘स्व-संकल्पना’ विकसित करावी – दशरथा एम. पीसीयू येथे क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन

काशिनाथ शिंदे : पिंपरी

 

पुणे  योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ऑटोमोबाईल क्षेत्रातील बदल, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्मार्ट सिटी, संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान तसेच एम्बेडेड सॉफ्टवेअरचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता तांत्रिक कौशल्यांसोबत स्व-संकल्पना विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीजचे प्रोग्राम डायरेक्टर दशरथा एम. यांनी केले.

 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीज आणि ब्लॅकबेरी क्यूएनएक्स यांच्या सहकार्याने  क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्स चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एम्बेडेड सिस्टिम्स, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम, ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, इंटेलिजंट मोबिलिटी तसेच उद्योगातील अत्याधुनिक तांत्रिक प्रवाह याबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे.

 

यावेळी पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीजचे प्रोग्राम डायरेक्टर दशरथा एम., ब्लॅकबेरी क्यूएनएक्सचे डायरेक्टर वीरकुमार बीडे, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

वीरकुमार बीडे यांनी क्यूएनएक्स रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक ऑटोमोटिव्ह, वैद्यकीय उपकरणे, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि सेफ्टी क्रिटिकल सिस्टिम्समध्ये या तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. उद्योगाच्या बदलत्या गरजा लक्षात घेता विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्यांसोबत स्वतःची वेगळी संकल्पना, विचारक्षमता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी सांगितले की, क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी विद्यापीठातच उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाचे संयोजन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आणि समन्वयक डॉ. नीरू मलिक यांनी केले.

See also  आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा

 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!