चिंचवडमध्ये एमडीचा ७.७४ लाखांचा साठा जप्त; कारसह आरोपी अटकेत!

काशिनाथ शिंदे

पिंपरी : अमली पदार्थ तस्करीविरोधात पिंपरी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत ७ लाख ७४ हजार रुपये किमतीची १५४.८ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सेलेरिओ कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.

अशोक गणपत गायकवाड (वय ४०, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या मध्यभागी सुरू असलेल्या मेट्रो पुलाखाली, अग्रसेन भवनसमोर, मोहननगर, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.

गायकवाड याच्याकडून १५४.८ ग्रॅम निव्वळ वजनाची एमडी पावडर आढळून आली. पॉलीथीन पिशवीसह तिचे एकूण वजन १५९.७८ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

तसेच आरोपीच्या ताब्यात असलेली एमएच १४ ईसी ९४४६ क्रमांकाची सिल्वर रंगाची मारुती सेलेरिओ कार पोलिसांनी जप्त केली.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६०/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा कलम ८(क), २१(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अतिग्रे करीत आहेत.

चिंचवडमध्ये एमडीचा साठा सापडल्याने अमली पदार्थ तस्करीचे जाळे पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

See also  संघर्षातून संशोधनात सुवर्णभरारी; डॉ. शिल्पा शांताराम पवार यांना पीएच.डी.
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!