तळेगाव टोलनाक्यावर पत्रकार कुटुंबाचा अपघात थोडक्यात टळला; कारवाईची मागणी

काशिनाथ  शिंदे  पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून २०२६ : तळेगाव टोलनाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या कथित उद्धट वर्तनामुळे आणि निष्काळजीपणामुळे एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवशाही शासन पक्षाने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पत्रकार आपल्या कुटुंबासह वाहनाने प्रवास करत असताना टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून कथितरित्या अयोग्य वर्तन करण्यात आले. तसेच अचानक बॅरियर उघडणे-बंद करणे आणि वाहन अडविण्याच्या प्रकारामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. चालकाने वेळीच वाहनावर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले.

या घटनेचा निषेध करत शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख युवराज भगवान दाखले यांनी दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शिवशाही शासन पक्षाने प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे, २४ तासांच्या आत त्यांना निलंबित करून चौकशी सुरू करणे तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे आणि पत्रकार कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई व लेखी दिलगिरी व्यक्त करणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी २४ तासांत कारवाई न झाल्यास तळेगाव टोलनाक्यावर आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवशाही शासन पक्षाने दिला आहे. पत्रकारांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले  आहे.

See also  लंडनमध्ये लपलेल्या निलेश घायवळला आणखी मोठा धक्का! घायवळ टोळीवर पोलिसांचा आणखी एक घाव
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!