तपासणीच्या बहाण्याने महिला रुग्णाचा विनयभंग; चेतना हॉस्पिटलमधील डॉक्टर अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. १५ जून : शहरातील चिंचवड परिसरातील चेतना हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तपासणीच्या बहाण्याने एका ३७ वर्षीय महिला रुग्णाशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. धैर्यशील शेटक (वय २७, मूळ रा. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. संबंधित महिला ८ जून रोजी मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी चेतना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ११ जून रोजी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

रविवारी (दि. १४ जून) शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू असताना आरोपी डॉक्टरने जनरल वॉर्डमध्ये तपासणीच्या निमित्ताने महिलेजवळ जाऊन तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने तात्काळ ही बाब आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये संताप व्यक्त केला. त्यानंतर निगडी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले. महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

See also  पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान