लोहगड किल्ल्यावर ‘अपघात’ नव्हे तर खून; प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या, तीन आरोपी जेरबंद

काशिनाथ शिंदे : लोणावळा

लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू अपघाती नसून तो पूर्वनियोजित खून असल्याचे उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने तरुणाला किल्ल्यावरील दरीत ढकलून ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात १८ जून रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस दरीत पडून केतन विशाल आगरवाल (वय २५, रा. लोढा बेलमोंडो टॉवर, मावळ) याचा मृत्यू झाल्याची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र मृताची होणारी पत्नी सिया गोयल यांनी दिलेल्या माहितीतून संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.

पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी स्वतः या प्रकरणाची माहिती घेऊन समांतर तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. तपासादरम्यान सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. सिया गोयलचा विवाह केतन आगरवाल याच्याशी झाल्यानंतरही हे संबंध कायम होते.

तपासात उघड झाले की, केतन आगरवाल हा त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने सिया गोयल, चेतन चौधरी आणि त्यांचा मित्र प्रियांकर यांनी कट रचला. त्यानुसार चेतन आगरवाल याला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेण्यात आले आणि संधी साधून त्याला दरीत ढकलून देण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी चेतन बाबूलाल चौधरी (वय २२, रा. पार्थनगर, बी-४/३०२, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला अटक केली. तसेच सिया प्रविण गोयल (वय २०, रा. लिलाकुंज, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, कोंढवा रोड, पुणे) हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील तिसऱ्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

See also  पुणे RTO ची अपघातांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम; ८ विशेष पथके रस्त्यावर उतरली!

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोपे आणि पोलिस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलिस करत आहेत.

  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!