प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Kashinath Shinde:

प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून थेरगाव परिसरात दोन तरुणांवर चाकू आणि चॉपरने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी आणि बालाजी कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. सुभान हमीद शेख (वय १९, रा. गुलमोहर कॉलनी, पुणे) याचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर अफद रमजान शेख (वय २२, रा. शिवशंभो कॉलनी, थेरगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.

तक्रारदार हमीद नजीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभान आणि सपना नावाच्या युवतीमध्ये प्रेमसंबंध होते. या संबंधांना युवतीची आई जयश्री कदम यांचा विरोध होता. त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे जयश्री कदम यांचा प्रियकर विशाल सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार अनिकेत सूर्यवंशी यांनी सुभान व त्याच्या मित्रावर चाकू व चॉपरने हल्ला केला.

हल्ल्यात सुभानच्या हात, पोट आणि मानेवर वार करण्यात आले, तर अफद शेख यालाही हात व पोटावर गंभीर दुखापती झाल्या. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आले; मात्र सुभानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खून व इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून काळेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

See also  "नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा"
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!