पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित

काशिनाथ शिंदे

पुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी दिशा देणाऱ्या पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) २०२६ आणि त्यासोबत आयोजित फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) २०२६ चे सोमवारी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी येथे दिमाखात उद्घाटन झाले. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे व्हाइस चेअरमन अरविंद गोयल यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी IMTMAच्या अध्यक्षा मोहिनी केळकर, उपाध्यक्ष विक्रम साळुंके आणि महासंचालकमुख्य कार्यकारी अधिकारी जिबक दासगुप्ता यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘मशीन टूल्ससाठी आयातीवर अवलंबून राहता येणार नाही’

उद्घाटनप्रसंगी अरविंद गोयल यांनी भारतातील स्थानिक उत्पादन क्षमता अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. भारतातील वाढती उत्पादन परिसंस्था मशीन टूल उद्योगासाठी मोठ्या संधी निर्माण करत असून, आगामी काळात भारत हा जागतिक उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल, असे त्यांनी सांगितले.

मशीन टूल्ससाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे देशांतर्गत मजबूत उत्पादन व्यवस्था उभारण्याची गरज आहे. भारताने मशीन टूल उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करून जगातील किमान तिसरा सर्वात मोठा मशीन टूल उत्पादक देश होण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन गोयल यांनी केले.

महाराष्ट्रातील मजबूत औद्योगिक परिसंस्थेचा फायदा

IMTMAच्या अध्यक्षा मोहिनी केळकर यांनी पुण्यात प्रदर्शन आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रात भारतातील सर्वात मजबूत मशीन टूल परिसंस्थांपैकी एक असून, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर येथे महत्त्वाचे औद्योगिक क्लस्टर आहेत, असे त्यांनी सांगितले.

See also  रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

पुणे हे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे उच्च अचूकतेच्या उत्पादन तंत्रज्ञानाची मोठी मागणी येथे आहे. ही गरज पूर्ण करण्यामध्ये मशीन टूल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात IMTMAचे सुमारे १८० सदस्य असून, गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून असोसिएशन उद्योगांना सातत्याने सहकार्य करत असल्याचे केळकर यांनी नमूद केले.

प्रत्येक आवृत्तीसोबत प्रदर्शनाचा विस्तार

IMTMAचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिबक दासगुप्ता म्हणाले की, पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे मजबूत केंद्र आहे. त्यामुळे या परिसरातील उत्पादन क्षेत्राशी संबंधित उद्योगसमूहापर्यंत पोहोचण्यासाठी PMTX आणि FACTEQचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक आवृत्तीसोबत या प्रदर्शनांचा लक्षणीय विस्तार होत असून, मशीन टूल उत्पादक तसेच त्यांचा वापर करणाऱ्या उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले.

११ हजार चौ.मी. क्षेत्रात औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन

यंदाच्या प्रदर्शनासाठी तब्बल ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ उपलब्ध असून, १७५ हून अधिक प्रदर्शक, ३०० ट्रेड डेलिगेशन आणि १८ हजारांहून अधिक अभ्यागत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अत्याधुनिक मशीन टूल्स, उत्पादन तंत्रज्ञान, फॅक्टरी उपकरणे आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध आधुनिक उपाययोजनांचे सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात येत आहे.

भारतीय उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान, उपकरणे आणि व्यावसायिक संधींची माहिती मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी : www.mtx.co.in आणि www.facteq.in

IMTMAविषयी

१९४६ मध्ये स्थापन झालेली इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) ही भारतातील मशीन टूल उद्योगाची सर्वोच्च औद्योगिक संघटना आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सुमारे ५८० कंपन्या IMTMAच्या सदस्य आहेत. या कंपन्या मेटल कटिंग व मेटल फॉर्मिंग मशीन, सब-सिस्टम्स, अॅक्सेसरीज, कटिंग टूल्स आणि अन्य संबंधित उपकरणांची निर्मिती करतात.

धोरणात्मक वकिली, ज्ञानविषयक व्यासपीठे, संशोधन अहवाल, प्रदर्शने, परिसंवाद, प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून मशीन टूल उद्योगाच्या वाढीसाठी IMTMA सक्रियपणे कार्यरत आहे.

  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!