RTI नियमांवरील वाद पेटला; अण्णा हजारे ५ जुलैपासून उपोषणाच्या तयारीत

काशिनाथ शिंदे : माहितीचा अधिकार (RTI) कायद्याच्या नियमावलीतील वादग्रस्त दुरुस्तींविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारने या दुरुस्त्या मागे न घेतल्यास ५ जुलैपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्य माहिती आयुक्त हे सरकारचे अधिकृत प्रतिनिधी नसताना त्यांनी अण्णा हजारे यांच्या भावना आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन कोणत्या अधिकारात दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकार कायद्याला कमकुवत करणाऱ्या कोणत्याही दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवून ठेवण्यासाठी जनतेनेही या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, सरकार याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या घोषणेमुळे RTI नियमांवरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

See also  "नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा"
  • Related Posts

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…

    पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन

    ११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे,  भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान